TEACHERS FELICITATION ON HINDI DIN @ MAHATMA PHULE HIGHSCHOOL & JR. COLLEGE, GHULEWADI, SANGAMNER

दाखल्यांना ‘एमकेसीएल’चा सेतू

//

दाखल्यांना ‘एमकेसीएल’चा सेतू

Apr 6, 2012, 12.57AM IST

 

//

//
//
दाखल्यांना ‘ एमकेसीएल ‘ चा सेतू
- शालेय सुटीतच जिल्हाधिकाऱ्यांचे नियोजन
- दाखले वेळेत मिळणार
- विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार
म . टा . प्रतिनिधी , नाशिक
शैक्षणिक कामासाठी आवश्यक असलेले विविध दाखले तसेच प्रमाणपत्र विभागस्तरावरील पाच सेतूंसह महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या ( एमकेसीएल ) २५ केंद्रांवर मिळणार आहेत . या निर्णयामुळे दरवर्षी सेतू कार्यालयात होणारी गर्दी , एजंटकडून केली जाणारी आर्थिक पिळवणूक , दाखले वेळेत न मिळणे या सर्वच गैरसोयी यंदा दूर होणार आहेत .
शैक्षणिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी विविध प्रकारचे सरकारी दाखले तसेच प्रमाणपत्रांची आवश्यकता असते . हे दाखले मिळावेत म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात सेतूची स्थापना करण्यात येते . शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे जात प्रमाणपत्र , वय व अधिवास प्रमाणपत्र , राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र , उत्पन्नाचा दाखला , एसईसी प्रमाणपत्र , नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र सेतू कार्यालयाद्वारे वितरीत केले जातात . शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजेच मे , जून आणि जुलै या काळात सेतू कार्यालयाला अक्षरश : जत्रेचे स्वरुप प्राप्त होते . या कार्यालयाच्या परिसरात वावरणारे एजंट विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करून त्यांची आर्थिक पिळवणूक करतात . त्यातही वेळेत दाखले तसेच प्रमाणपत्र न मिळाल्याने विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणेही अवघड होते . या सर्व प्रकारात वेळ , पैसा यांचा अपव्यय , कागदपत्रांसाठीची जुळवाजुळव तसेच मानसिक त्रास या सर्वांना आळा घालण्याची वारंवार मागणी करण्यात येते . जिल्हाधिकारी पी . वेलरासू यांनी या सर्व बाबींची दखल घेत सेतू कार्यालय , त्यातील कारभार आणि विद्यार्थ्यांची गैरसोय या सर्वांवरच परिणामकारक उत्तर शोधले आहे . सद्यस्थितीत नाशिक शहराच्या पाच भागात विभागीय सेतू कार्यालय सुरू आहेत . या पाच ठिकाणांबरोबरच एमकेसीएलच्या २५ केंद्रांवर शैक्षणिक दाखले मिळण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे .
सेतू यापूर्वीच ऑनलाइनही उपलब्ध करून देण्यात आले आहेत . मात्र , ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यासाठीचे कागदपत्र जमा करण्यासाठी सेतू कार्यालयात जावेच लागते . त्यामुळे ऑनलाइन सोय करूनही गर्दीचा प्रश्न राहतोच . त्यामुळे यंदा विभागीय सेतूसह एमकेसीएलच्या केंद्रावर विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासह पैसे भरणे , कागदपत्रे देणे आदि सुविधा उपलब्ध होणार आहेत . सेतूमध्ये द्यायचे प्रतीज्ञापत्र विद्यार्थ्यांना सोयीच्या नोटरीद्वारेही देता येणार आहे . एकूण ३० केंद्रांद्वारे शैक्षणिक दाखले देण्यात येणार असल्याने गर्दीचे विकेंद्रीकरण होण्याबरोबरच विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील केंद्रातच हे दाखले उपलब्ध होणार आहेत . परिणामी , दाखल्यांसाठी होणारा विद्यार्थी , पालक आणि प्रशासनाचा संघर्ष यंदा टळणार आहे .