<a href="http://marketing.mkcl.org/wp-content/uploads/2018/01/2018-01-25-18-34-05-
386.jpg”>
डिजिटल इंडिया उपक्रमा अंतर्गत महिला डिजिटली साक्षर व्हाव्यात या हेतूने सॉफ्टेक कॉम्प्युटर एज्युकेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर सहेली यांच्या सयुंक्त विद्यमाने दिनांक 16 जानेवारी ते 23 जानेवारी पर्यंत 8 दिवसांची कॉम्प्यूटर व मोबाईल प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेतील पहिली *40* महिलांची एक बॅच पूर्ण झाली. यामध्ये ईमेल, सेअर्चींग, फेसबुक, व्हाट्सअप्प, महिलांसाठी उपयुक्त सॉफ्टवेअर, दैनंदिन कामांची नोंदी करणे, लाईट बिल, फोन बिल, विमा हप्ते ऑनलाईन भरणे, नेटबँकिंग, ATM कार्ड, ऑनलाईन बस, रेल्वे व विमान तिकीट बुकिंग सेवा, शासनाच्या विविध सेवेची माहिती, कॅराओके गाणी, आरोग्याची काळजी घेण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी महिलांना आवश्यक योग्य आहार मार्गदर्शनपर विविध ऍपचा वापर, गूगल मॅप, सोशल नेट्वर्कचा योग्य वापर, या विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेनंतर सर्व सहभागी महिलांमध्ये डिजिटल *सुपर वुमन 2018* काँटेस्ट घेण्यात आली. या स्पर्धेसाठी एकूण 5 फेऱ्या होत्या. पहिली फेरी *‘मला रोबोट मिळाला तर..’* या विषयावर बोलणे, दुसरी व तिसरी फेरी *जनरल व डिजिटल प्रश्नोत्तराची,* चौथी *कॅरओके सोलो सॉंग* सादर करणे व अंतिम फेरी ही *अभिप्रायची* होती. या स्पर्धेच्या भाग्यवान विजेत्या *सौ सीमा हसबनिस* यांना *डिजिटल सुपर वुमन 2018* हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी *सॉफ्टेक च्या संचालिका सौ संगीता शहा व जायंट्स सहेलीच्या अध्यक्षा सौ साधना राजपूत* यांनी प्रास्ताविक केले. *स्वागत सौ श्रद्धा कुलकर्णी* यांनी केले. *सौ कविता शहा यांनी सूत्रसंचालन* केले. *सौ धनश्री पाटील व सौ लीना पटेल* यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. या कार्यशाळेसाठी *स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा प्रमुख मा. मोरासकर, सौ अनुजा शहा,* पल्लवी चिपरिकर, सौ स्मिता दळवी, कोमल इंगळे यांचे सहकार्य लाभले. *संयोजन जायंट्स सहेलीच्या कार्यवाह डॉ सोनल शहा, चारुशीला फल्ले, ऍड सौ शैलजा पाटील, सौ माधुरी यादव, डॉ अनिता पाटील, वैदेही भोसले, डॉ वंदना पाटील यांनी केले.*